Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
आयुर्वेदाच्या एका वळणावर...

अमरावतीतील विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. रश्मी दंडे यांनी एवियन मदुराई येथे सहा महिने निवासी डॉक्टर म्हणून काम केले. लग्नानंतर दोन वर्षांनी वैद्यकीय सेवेची सुरुवात झाली, मात्र आर्थिक अडचणींमुळे स्वतःचे क्लिनिक सुरु करता आले नाही. म्हणून अमरावतीतील स्त्रीरोगतज्ञ यांच्याकडे नऊ वर्ष जॉब केला. परंतु आयुर्वेद क्षेत्रामध्ये काही करू शकले नाही, ही खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काही दिवसांमध्ये आयुर्वेदिक गर्भसंस्कार वर्ग घेण्यास सुरुवात केली. आयुर्वेदिक औषधांबाबत जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली.

अमरावतीमध्ये आयुर्वेद क्षेत्रात काम करणारे वैद्य तसे फारच कमी होते. आयुर्वेदाबाबत अजून जाणून घेण्यासाठी त्या श्री वशिष्ठ कुमार जोशी सरांकडे गेल्या. आयुर्वेद शिकण्यास सुरुवात केली. परंतु जोशी सरांना अचानक देवाज्ञा झाली व एका चांगल्या गुरुची साथ सुटली. पण आयुर्वेदाची साथ सुटली नाही आणि पुन्हा एका नवीन गुरूचा शोध सुरु झाला. यादरम्यान नॅशनल रूरल हेल्थ मिशनमध्ये शालेय आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. त्यामुळे नोकरी व आयुर्वेदाचा सराव अशी कसरत सुरु होती. आयुर्वेदात जोपर्यंत चांगला गुरु नाही, तोपर्यंत आयुर्वेद अचूकपणे समजणे शक्य नाही, हे त्यांना ज्ञात होते. मार्ग दाखविण्यासाठी एका उत्तम गुरुची साथ होती, असा विचार नेहमी मनामध्ये यायचा. गुरूच्या शोधात असताना फेसबुक व ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वैद्य हरीश पाटणकर सरांच्या कॉस्मेटोलॉजी कोर्सबद्दल त्यांना माहिती मिळाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यास या कोर्स मधून नक्कीच काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल याबाबत खात्री झाली. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली व एका चांगल्या व ध्येयवेड्या गुरूचा शोधही संपला. वैद्य हरीश पाटणकर यांच्यामुळे दृष्टिआड गेलेला आयुर्वेद रश्मी यांच्यासमोर पुन्हा नव्याने आला.
    एक नवीन सुरुवात, जी गोष्ट 12 वर्षांमध्ये शक्य झाली नाही, ती वैद्य पाटणकर सरांच्या साथीने दोन वर्षात पूर्ण झाली. नवीन उत्साहाने आयुर्वेद स्किन व हेअर क्लिनिक सुरु केले. आपल्या सोबत सकारात्मक शक्ती असेल, तर कितीही अशक्य गोष्ट आपण मिळवू शकतो, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला व त्यातून मिळालेले मानसिक समाधान व स्वतःवरील विश्वास खूप महत्वाचा आहे. कमी कालावधीमध्ये क्लिनिकला लोकांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद याचे सर्व श्रेय केशायुर्वेदला जाते. क्लिनिकमध्ये येणार्या प्रत्येक रुग्णाला त्यांच्या गरजेनुसार केशायुर्वेदाच्या विशेष पद्धतीनुसार परीक्षण करुन रिझल्ट्स देणे हा माझ्या क्लिनिकचा जणू एक महत्वपूर्ण भाग बनला आहे, असे डॉ. रश्मी दंडे सांगत होत्या.
त्यांच्यासह त्यांच्या रुग्णांचा केशायुर्वेदबाबत खूप चांगला अनुभव आहे. केशायुर्वेदच्या माध्यमातून अनेक पॉझिटिव्ह स्टोरीज त्यांच्या क्लिनिकमध्ये घडल्या आहेत. म्हणूनच केशायुर्वेद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे अशी इच्छा त्या व्यक्त करतात. त्यासाठी जेसीआय, रोटरी क्लब, लोकमत सखी यांसारख्या सामाजिक व महिला संस्थांमध्ये जाऊन त्या सतत मार्गदर्शन करत असतात.
केशायुर्वेदसोबत काम करत असताना अनेक चांगले अनुभव आले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनेक नवनवीन मैत्रिणी मिळाल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी मैत्री वाढली. यात सर्वात महत्वपूर्ण आणि सदैव लक्षात राहील, असा अनुभव म्हणजे एकदा एक डिप्रेशनचा रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे. पूर्वीसारखा इतरांना सन्मान देत आहे. सर्वांशी मनमोकळेपणाने बोलत आहे आणि या सर्व बदलाचे श्रेय जर रुग्ण आपल्याला देत असेल, तर यासारखे आंतरिक समाधान दुसरे कोणतेही नाही, असे त्यांना वाटते. यांसारख्या अनेक प्रोत्साहन देणार्या घटना घडल्या आहेत. आयुर्वेद व योग या क्षेत्रामध्ये भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. इतर क्षेत्राप्रमाणे आयुर्वेदामध्येही सुपर स्पेशालिस्ट तयार होणे आवश्यक आहे.

पुरस्कारांबाबत विचारले असता, त्या म्हणतात, क्लिनिक मधून बाहेर पडताना रुग्णांच्या चेहर्यावर दिसणारे समाधान हा वैद्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये पेपर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. यासाठी बेस्ट प्रेझेंटर म्हणून गौरविण्यात आले. यात वैद्य स्नेहल पाटणकर यांचे मोठे योगदान आहे. वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस (डब्ल्यूएसी) अहमदाबाद येथे पेपर सादरीकरण, स्पर्श केरला येथे पेपर प्रेझेंटेशन, तसेच केशायुर्वेद मित्र पुरस्कार असे अनेक सन्मान व ट्रायकॉन दिल्ली येथे उत्कृष्ट पेपरसाठी सन्मानही प्राप्त झाला. 2018 मध्ये रश्मी दंडे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल ‘केशार्युवेद मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. युक्रेन येथील एका आयुर्वेद केंद्रास भेट देण्यासाठी नुकतीच त्यांची निवड झाली आहे. जुलै महिन्यात त्या युक्रेनला जाणार असून, त्यांच्यामार्फत आयुर्वेद व केशार्युवेद विदेशात पोहोचणार आहे. डॉ. रश्मी या ध्यासाने प्रेरित होऊन काम करीत आहेत.

 

 

Organisation Details

नाव : डॉक्टर रश्मी दांडे
शिक्षण : बीएएमएस, आयुर्वेदाचार्य
क्लिनिकचे नाव : तनुवेदा हॉलिस्टीक वेलनेस सेंटर
पत्ता : मुधोळकर पेठ कोरडे हॉस्पिटल समोर, अमरावती
संपर्क : 9371 44 98 82
ईमेल : danderashmigmail.com
वेबसाईट : www.tanuveda.com
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2006
केशायुर्वेद फ्रँचाईजी : मे 2017

Our Specialities

  • One stop solution for all your hair and skin problem.
  • Accurate diagnosis and perfect treatment.
  • Complete Scalp Analysis, Photography, Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient) and HP (Hair Prakruti ) analysis.
  • Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s, Cosmetologist’s, Trichologist’s.
  • Wide range of hair and skin care herbal products.